breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

देशावरील हल्ल्याचा बदला घेण्याच्यावेळी ही 56 इंचाची छाती धुळ्यात होती – शरद पवार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात
  • पार्थ पवार यांच्या प्रचार सभेत केली टिका

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुलवामा येथील जवानांच्या बसवर हल्ला झाल्यानंतर दुस-या दिवशी मझ्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांना दिल्लीला बैठकीसाठी बोलावलं. देशावर झालेल्या हल्ल्यासाठी राजकारण बाजुला ठेवून वाट्टेल ती किंमत मोजण्याची आम्ही तयारी दाखविली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामण त्याठिकाणी उपस्थित नव्हत्या. देशावरील झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची वेळ आली तेव्हा ही 56 इंचाची छाती धुळे आणि यवतमाळमध्ये होती, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला.

  • राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप, आरपीआय जोगेंद्र कवाडे गट यांच्या आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवार यांच्या हस्ते आज पिंपरी-चिंचवडमध्ये फोडण्यात आला. यावेळी व्यासपीठावरून पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंतराव पाटील, मावळचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नेते नाना काटे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड मधला कामगार असेल. शेती उध्वस्त झालेला शेतकरी असेल. या लोकांवर देहू-आळंदीचे संस्कार आहेत. आळंदी आणि देहू परिसरात राहणा-या लोकांच्या योगदानामुळेच देशाच्या लोकसभेत मी एकदा नव्हे, तर तब्बल सातवेळा गेलो. हे योगदान केवळ पार्थ पवार यासाठी नव्हे तर अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांच्यासाठी देखील हवे आहे.

  • पवार पुढे म्हणाले की, जम्मू पासून श्रीनगरपर्यंत भारताच्या जवानांना घेऊन बस निघाली होती. स्फोटके घेऊन आलेली जीप बसवर आदळली. आपल्या 40 जवानांना मृत्यू आला. दुस-या दिवशी आम्हाला दिल्लीला बोलावलं. जवानांची हत्या केल्यानंतर घरातलं भांडण काडायचं नाही, म्हणून आम्ही सरकारच्या पाठीशी उभारण्याचं काम केलं. लष्कराचे अधिकारी होते. सर्व पक्षाचे नेते होते. आम्हाला विचारलं होतं काय करायचं म्हणून. त्यावेळी मी सांगितलं की, लष्कराला दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्याचे आदेश द्या म्हणून. जे शस्त्र लागेल त्याचा उपयोग करावा. कारण, जवानांची हत्या अस्वस्थ करणारी आहे. परंतु, हा निर्णय घेतेवेळी बैठकीला नरेंद्र मोदी आणि निर्मला सितारामण उपस्थित नव्हते. हे महाशय धुळ्यात होते. त्यानंतर यवतमाळला गेले. एवढे जवान शहीद होतात. त्यांच्या घरी जाऊन पत्नीचे आश्रु पुसण्याचे काम या महाशयांनी दाखविलं नाही. सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येतात. परंतु, प्रधानमंत्री यांना ही गोष्ट महत्वाची वाटली नाही, हे खेदाची बाब आहे. हल्ला झाल्यानंतर भारताचं विमान पाडून अभिनंदनला पकडलं. त्याला मारहान केली. आंतरराष्ट्रीय करारावर जगातल्या शंभर देशांनी सही केली आहे. त्यात भारताचा सुध्दा सहभाग आहे. या करारानुसार युध्द कैद्यांना सोडण्याची भूमिका संबंधीत राष्ट्रांनी घ्यावी लागते. जगातल्या सर्व देशांनी दबाव आणला म्हणून पाकिस्तानला अभिनंद सोडावा लागला. त्याच्या पत्नीने काय सांगितलं. माझ्या नव-याने दाखविलेलं शौर्य याचा मला अभिमान आहे. परंतु, त्यांनी राजकीय पक्षांना विशेषता भाजपला विनंती केली, की जवानांच्या शौर्याचा फायदा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी करू नका, असेही पवार म्हणाले.

राफेलच्या एका विमानाची 350 कोटी किंमत होती. भाजपच्या काळात इमानाची किमीत 560 कोटी रुपये झाली. एक वर्षानंतर 750 कोटी झाली. त्यानंतर फ्रान्सची कंपनी आणि रिलायन्स कंपनीमध्ये करार झाला. त्यावेळी 1600 कोटी रुपये विमानाची किंमत झाली. त्याची माहिती मागितली तेव्हा ती गुप्त आहे, असं सांगितलं. तीन महिन्यानंतर सुप्रिम कोर्टाने या वादाची कागदपत्रे मागितली त्यावर ते कागदपत्र संरक्षण खात्याच्या कार्यालयातून चोरीला गेल्याचे जाहिर केलं. तीन दिवसांनी हिंदू वर्तमानपत्रात सर्व कागदपत्र छापून आली. देशाच्या संरक्षणाची गुप्त कागदं सांभाळता येत नाहीत. नुसती 56 इंचाची छाती काय कामाची आहे, अशीही तोफ पवार यांनी डागली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button