breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवे घाटात वारकरी दिंडीत जेसीबी घुसला; नामदेव महाराजांच्या वंशजांसह दोघांचा मृत्यू

पुणे | महाईन्यूज

पुण्याच्या जवळील दिवे घाटात पंढरपूरवरून आळंदीकडे निघालेल्या वारकरी दिंडीला भीषण अपघात मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचं अपघाती निधन झालं आहे. दरम्यान, जखमींवर हडपसरमधील नोबेल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर बंडा तात्या कराडकर हे स्वतः नोबेल हॉस्पिटलमध्ये पोहोचून जखमींच्या उपचाराकडे लक्ष देत आहे.

या घटनेत अन्य १५ जण जखमी झाले आहेत. संत नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरवरून आळंदीला जात असताना त्याला आज सकाळी अपघात झाला. ही पालखी दिवेघाटात असताने जेसीबी अचानक या पालखीत घुसली. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी अशी निधन झालेल्यांची नावं आहेत. दरम्यान, जेसीबीचे ब्रेक यापूर्वीच निकामी झाले होते. तसंच चालकाला वाहन उतरवू नये, अशी विनंतीही करण्यात आली होती, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली.

चहापान करण्यासाठी सर्व वारकरी एका ठिकाणी थांबले होते. काही अंतरावर हा जेसीबी होता. जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याची माहिती समजल्यानंतर चालकाला उतारावरून वाहन आणू नये, अशी अशी विनंती केली होती. परंतु, अर्धा तास थांबल्यानंतर चालकाने पुन्हा जेसीबी सुरू केला. उतारावरून येत असताना त्यानं पहिले एका रिक्षाला धडक दिली आणि त्यानंतर काही वारकरी हे जेसीबी खाली आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button