breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दिल्लीत निवडणुका, गल्लीत कामांचा धडाका

उद्याने, क्रीडासंकुले पूर्णत्वास

नव्या वर्षांत केंद्रीय आणि राज्य स्तरावर निवडणुकांची चर्चा सुरू असताना मुंबई महानगरपालिकेने शहराच्या गल्लीबोळांत विकासकामांचा धडाका लावला आहे. क्रीडा संकुले, उड्डाणपुलांखाली उद्याने, राणीच्या बागेचे नूतनीकरण, सायकल ट्रॅक यांसारख्या योजना येत्या वर्षांत मार्गी लावल्या जाणार आहेत.

बोरिवली येथे १२ एकर जागेत भावदेवी क्रीडा संकुल, तर अंधेरी येथील वि. रा. देसाई मार्गावर ११ एकर जागेत क्रीडा संकुल साकारण्यात येत आहे. त्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. स्कायवॉक, मेट्रो पूल आणि उड्डाणपुलांखाली सुमारे तीन लाख १४ हजार ३२६ चौरस फुटांच्या जागेत २२ उद्याने साकारण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे.

आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा

पालिकेची मोठी, उपनगरीय रुग्णालये, दवाखाना, प्रसूतिगृहे आदींमध्ये केसपेपर व अन्य कामांचे टप्प्याटप्प्याने संगणकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचा माहिती तंत्रज्ञान विभाग, सार्वजनिक आरोग्य खाते, रुग्णालये संयुक्तपणे आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा (हेल्थ मॅनेजमेन्ट इन्फॉर्मेशन सिस्टम) कार्यान्वित करणार आहेत. पुढील वर्षांपासून त्यास सुरुवात होईल.

राणीच्या बागेचे नूतनीकरण

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या (राणीची बाग) नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राणीच्या बागेत प्राणी व पक्ष्यांसाठी १७ अद्ययावत पिंजरे तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ पिंजरे प्राण्यांसाठी, तर दोन पिंजरे पक्ष्यांसाठी असतील. वाघ, सिंह, बारशिंगा, काळवीट, लांडगा, कोल्हा, नीलगाय ठेवण्यात येणार आहे. पुढील वर्षी मुंबईकरांना या प्राण्यांचे दर्शन घडेल. त्याचबरोबर राणीच्या बागेलगतचा २७,२८४.३६ चौरस मीटरचा भूखंड पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे. याविरोधात दाखल झालेली याचिका न्यायालयाने निकालात काढली असून या भूखंडाच्या विकासाला नव्या वर्षांत सुरुवात होईल.

मलजल प्रक्रिया केंद्र

पाणी उपलपब्ध व्हावे यासाठी पालिकेने मुंबईत सात ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ३७ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या कुलाबा येथील मलजल प्रक्रिया केंद्राचे नव्या वर्षांत लोकार्पण करण्यात येईल.

सायकल ट्रॅक

पालिकेने मुंबईकरांना ३९ किमीचा सायकल ट्रॅक उपलब्ध करण्याचा संकल्प सोडला आहे. पहिल्या टप्प्यातील दोन सायकल ट्रॅक नव्या वर्षांत उपलब्ध होतील. त्यावरून मुंबईकरांना मुलुंडहून धारावीपर्यंत आणि घाटकोपरहून शीवपर्यंत सायकल सफर करता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button