Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
दहावी-बारावीची फेरपरीक्षा १७ जुलैपासून
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Exam-69.jpg)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीतील अनुत्तीर्ण आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची फेरपरीक्षा १७ जुलैपासून सुरू होत आहे. त्यानुसार १७ ते ३० जुलैदरम्यान दहावीची, १७ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान बारावीची आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीतील व्यावसायिक अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
या परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेसाठी अतिविशेष अतिविलंब शुल्क भरून परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.