Breaking-newsमहाराष्ट्र
दळभद्री सरकारला सत्तेवरून घालवल्याशिवाय जनसंघर्ष थांबवणार नाही- अशोक चव्हाण

जळगाव– काँग्रेसने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंघर्ष यात्रेव्दारे प्रचार सुरु केला आहे. दरम्यान, जळगाव येथील सभेत ८७ वर्षीय शेतकरी दौलतराव साळुंखे यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात फसवणूक झाल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सांगितले. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली प्रत्यक्षात मात्र कर्जमाफी दिली नाही.
दरम्यान अशोक चव्हाण यांनी, दळभद्री सरकारला सत्तेवरून घालवल्याशिवाय जनसंघर्ष थांबवणार नसल्याचे सांगत भाजप सरकार विरोधात हल्लाबोल केला.





