breaking-newsपुणेमहाराष्ट्र

तीन वर्षांनंतर मिळाला पूर्णवेळ अधिकारी

प्रदूषण नियंत्रण मंडळच्या प्रादेशिक अधिकारीपदी दिलीप खेडेकर

पुणे – प्रदूषण नियंत्रणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक अधिकारी या पदावर दिलीप खेडेकर यांची नियुक्ती झाली आहे. सुमारे तीन वर्षांनंतर मंडळाच्या पुणे विभागासाठी पूर्णवेळ प्रादेशिक अधिकारी नेमण्यात आला आहे. यामुळे शहराच्या प्रदूषण नियंत्रणाच्या कार्याला चालना मिळणार आहे.

मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त होते. मंडळाच्या “झोन टू’चे उपप्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त भार होता. मात्र, पूर्णवेळ प्रादेशिक अधिकारी नसल्याने मंडळाच्या कामात अडथळे येत होते. त्यामुळे खेडकर यांची नियुक्ती ही महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्याकडे पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा अधिकार असणार आहे. खेडकर हे यापूर्वी कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी होते. ते प्रदूषण नियंत्रण मंडळात 1996 पासून कार्यरत असून, आतापर्यंत मुंबई, रायगड आणि कोल्हापूर याठिकाणी त्यांनी कार्य केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button