Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तिवरे धरणफुटीच्या सात दिवसानंतर 4 जणं अजुनही बेपत्ता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/70113876.jpg)
रत्नागिरी – तिवरे धरण फुटण्याच्या दुर्घटनेला आज 7 दिवस पूर्ण झालेत. मात्र अजुनही 4 जणांचे मृतदेह मिळाले नसल्याचं NDRF पथकाच्या बचाव पथकाचे प्रमुख राजेश येवले यांनी सांगितलंय. आत्तापर्यंत 19 मृतदेह शोधण्यास NDRFच्या जवानांना यश आलंय. पाण्याचा असलेला प्रचंड प्रवाह, चिखल आणि कठीण वाटेमुळे अडचण येत असल्याचं त्यांनी सांगितलं. आणखी काही दिवस हा शोध सुरूच राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तिवरे धरण दुर्घटनेला आठवडा पूर्ण होत आलाय तरीही या धरणाच्या लगत असलेल्या फणस वाडीची दळणवळणाची समस्या कायम आहे. या वाडीत जाणारा पूल आजही मातीखालीच आहे, त्यामुळे जाण्या-येण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे या वाडीतील जवळपास 50 घरांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. तर मुलांच्या शाळेची समस्या निर्माण झालीय.