तान्हाजी मालुसरेंच्या घराचा होणार जीर्णोद्धार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/14-3.jpg)
मुंबई – महाराष्ट्रातील ‘उमरठ’ या गावातील नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या घराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय या गावात बालपण घालवलेल्या हरीओम घाडगे यांनी घेतला आहे. याच गावात लहानाचे मोठे झालेले हरीओम घाडगे यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने या वास्तूचा जीर्णोद्धार करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
हरीओम घाडगे यांनी नरवीर तान्हाजी मालुसरे यांना नेहमीच स्फुर्ती आणि प्रेरणा स्थान मानलं आहे. तान्हाजी आणि सूर्याजी यांचे धैर्य, जिद्द, बंधू प्रेम हे संस्कार त्यांच्यावर केले गेले आहेत. त्यांच ऋण कुठे तरी फेडाव असं त्यांना वाटत असताना शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तान्हाजी मालुसरेंच्या वास्तूचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले आहे. नुकतंच याचं भूमीपूजन करण्यात आलं आहे.
या वास्तूच्या बांधणीसाठी लागणारा निधी हरीओम घाडगे यांच्याकडून दिला जाणार आहे मात्र तेथील गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या वास्तूच्या पुनः निर्मितीसाठी श्रमदान करण्याचे ठरविले आहे.