breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

… तर मी शिक्षा भोगायलाही तयार – गिरीश महाजन

जळगाव – जळगाव विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला डांबून ठेवल्या प्रकरणी भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाजन यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी गिरीश महाजन यांनी आपली बाजू मांडत सर्व आरोप फेटाळले आहे.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,50,171 वर

या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी व आरोप खरे निघाल्यास आपण शिक्षा भोगण्यास देखील तयार असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले की, माझ्यावर केलेल्या आरोपांपैकी एक टक्का जरी गोष्ट खरी असेल तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. ही घटना शंभर टक्के खोटी आहे. महाराष्ट्र पोलिसांनी याची चौकशी करावी.

हा गंभीर आरोप नाही तर हास्यास्पद आरोप आहे तीन वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याची त्यांनी आता तक्रार केली. अतिशय बनवाबनवी चालली आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम सरकारकडून सुरु असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

दरम्यान, याबाबत विजय पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गिरीश महाजन, तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button