breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

…तर तुमचा वाहन परवाना कायमस्वरुपी रद्द होणार

मुंबई | महाईन्यूज

गेल्या तीन महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १ हजार २४७ जणांचे वाहतूक परवाने रद्द केले आहेत. बेदरकारपणे वाहन चालवल्यानं आणि सिग्नल तोडल्यानं ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी मुंबईत २ हजार ८१४ रस्ते अपघात झालेले होते. त्यात ४०३ जणांचा मृत्यू झालेला होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबईतल्या वाहतूक पोलिसांनी आरटीओला एक प्रस्ताव दिला होता. त्यानंतर वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी एक सूचना जारी केलेली होती.

एखादी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यास, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असल्यास, सिग्नल तोडत असल्यास त्याचा परवाना किमान तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात यावा, असं महाराष्ट्र पोलिसांनी सूचनेत म्हटलंले होतं. वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्याची कारवाई झाल्यानंतरही बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाऊ शकतो. ‘एखादी व्यक्ती वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असल्यास तिचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाईल,’ अशी माहिती वाहतूक विभागाचे प्रवक्ते अभय देशपांडे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button