Breaking-newsमहाराष्ट्र
डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Injection101.jpg)
चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे हिरापूर (जि. जळगाव) येथील १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिरापूर येथील डॉ. रंजन देसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन आणि जिल्हा चिकित्सकांच्या अहवालानुसार डॉ. देसले यांच्यावर मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
धनराज अशोक मोरे असे मृताचे नाव आहे. धनराजला ताप व जुलाब- उलट्या होत असल्याने २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी गावातीलच बीएएमएस डॉ. देसले यांच्या कृष्णा क्लिनिकमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याची प्रकृती खालावली. ३० सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला होता.