breaking-newsमहाराष्ट्र

ठाणे जेलमध्ये कैद्याला मारहाण करुन विष्ठा खायला लावली : रमेश कदम

मुंबई – अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी ठाणे जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. जेल प्रशासनाने एका कैद्याला जबर मारहाण करुन त्याला मानवी विष्ठा खायला लावली असा आरोप रमेश कदम यांनी केला आहे. यानंतर कैद्याची प्रकृती बिघडली होती, असा दावाही त्यांनी केला आहे.

रमेश कदम यांच्या आरोपांनुसार, “ठाणे जेलमध्ये 27 जून रोजी ही घटना घडली. जेल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी एका कैद्याला मारहाण केलीच शिवाय त्याला मानवी विष्ठा खायला लावली.” रमेश कदम यांनी यासंदर्भात मानवाधिकार आयोगाला आयोगाकडे तक्रार नोंदवली असून आयोगाने जेल प्रशासनाला समन्स पाठवला आहे. तसंच आरोपांना आधार म्हणून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

जेलर आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करु, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम सध्या अटकेत असून, त्यांनी 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पुणे-नगर रस्त्यावरील ग्रँण्ड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून सीआयडीच्या पथकाने त्यांना अटक केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button