Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
टाळेबंदीत अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्न धान्य – अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ
![District wise Independent Transport Contract Tender Process for Efficient Transportation of Ration Transport - Food and Civil Supplies Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/ration-shop_20171017808.jpg)
देशात आणि राज्यात करोनामुळे मोठे संकट उभे राहिले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप आणि अन्नछत्र सुरू करण्यात आली आहे. या अन्नधान्य वितरण व अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्नधान्य मिळावे यासाठी केंद्र सरकारची देशांतर्गत खुली बाजार विक्री योजना(ओएमएसएस) योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.