Breaking-newsमहाराष्ट्र
ज्येष्ठ कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/magdum-.jpg)
सांगली – येथील हमाल पंचायत व हिंद मजदूर सभेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब मगदूम यांचे 3 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता निधन झाले.
ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांचे सहकारी म्हणून ते ओळखले जात. बाबा आढाव यांच्या सोबत त्यांनी हमालांच्या हक्कासाठी व प्रश्नावर अनेक आंदोलने केली व त्यांना सन्मान मिळवून दिला. समाजवादी, पुरोगामी कष्टकरी, कामगार यांचे नेते म्हणून त्यांची जिल्ह्यात, राज्यात ओळख होती.
जिल्ह्यातील पुरोगामी, समाजवादी संघटनेचा आधारवड गेल्याची भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या जाण्याने समाजवादी, पुरोगामी परिवाराचे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.