breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
‘जीएसटी’वरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/05/fadnavisuddhav.jpg)
मुंबई : जीएसटीवरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यताय. जीएसटीबाबत भाजपनं ठेवलेला मंगळवारच्या बैठकीचा प्रस्ताव शिवसेनेनं धुडकावला आहे. जीएसटीरून भाजपाची कोंडी करण्याचा शिवसेनेकडून केला जातो.
विधेयक हातात आल्यानंतर चर्चेबाबत ठरवू, तोपर्यंत जीएसटीबाबत चर्चा करणार नसल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. मुंबईतील जकातीबाबत थेट विधेयकात तरतुद करण्याची शिवसेनेची मागणी आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी सकाळी यासंदर्भात मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेमुळे मुनगंटीवारांची मातोश्रीवारी वाया गेली आहे.