breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्याला बारामतीच्या दावणीला बांधणा-यांना दारात उभे करू नका – पंकजा मुंडे

पंधरा वर्ष सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एक वीटही रचली नाही. आता तेच लोक मी मंजूर केलेल्या कामांची उद्घाटने करत सुटली आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांची हुजरेगिरी करुन जिल्ह्याला बारामतीच्या दावणीला बांधणाऱ्यांना निवडणूक काळात दारातही उभा करू नका, असा टोला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना नाव न घेता लगावला.

अंबाजोगाई येथे २ कोटी २१ लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या तालुका पशुवैद्यकीय व पशुचिकित्सालयाच्या इमारतीचे उद्घाटन आणि केज तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ८० कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ रविवारी झाला. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी आमदार संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, सभापती संतोष हांगे, जिल्हा परिषद सदस्या डॉ.योगिनी थोरात आदि उपस्थित होते. या वेळी बोलताना मंत्री मुंडे यांनी साडेचार वर्षांत आपण वर्षांनुवर्ष टिकेल अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देत आहे.

विकास कामांची उद्घाटने करायला वेळ मिळत नाही. ठरवलं तर रोज पाचशे कोटी रुपयांच्या कामांची उद्घाटने करू शकते. मला फक्त विकासाचे राजकारण करायचे आहे. त्यामुळे मी केलेल्या विकास कामांची निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटने करण्याचा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात आहे. पंधरा वर्ष सत्ता असताना एक वीटही उभा करता आली नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची हुजरेगिरी करुन जिल्ह्यला बारामतीच्या दावणीला बांधणाऱ्यांना दारातही उभा करू नका असा हल्ला करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा थेट नामोल्लेख टाळून टोला लगावला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button