‘जामिया विद्यापीठातील आंदोलनात विद्यार्थी नव्हतेच, राधाकृष्ण विखे पाटलांचा वेगळेच वक्तव्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/vikhe-patil-Frame-copy.jpg)
मुंबई | महाईन्यूज
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशातील वातावरण चिघळलं आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमधून या कायद्याविरुद्ध जनमत तयार झालं आहे. जामिया मिलिया विद्यापीठात आंदोलनला हिंसक वळण मिळालं. या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र, या आंदोलनात विद्यार्थी नसून राजकीय पक्षाची भूमिका घेणारे लोकं असल्याचं भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.
देशभरात सुरू असलेलं आंदोलन हे जनतेचं आंदोलन नसून राजकीय पक्षांचं आहे. जामिया विद्यापीठातलं आंदोलन जे आहे, ते पूर्णत: पॉलिटीकली मोटीव्हेटेड आंदोलन आहे. या आंदोलनास मिळणारा पाठिंबा अतिशय नगण्य आहे. जाळपोळ आणि पोलिसांचा लाठीचार्ज ही मोठी घटना आहे. पण, आंदोलनात राजकीय भूमिका दिसत असून विद्यार्थी हे राजकीय पक्षाच्या चळवळीतील आहेत, असे भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.