breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

चिंचवडमधील मतदानाची घसरती टक्केवारी कोणाच्या पथ्यावर!

  • आमदार लक्ष्मण जगताप हॅट्रीक करणार?
  • अपक्ष राहूल कलाटे यांचा विजय होणार?

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदार संघातील मतदानाचा घसरता टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. मतदान कमी झाले असले, तरी यामध्ये विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांची हॅट्रीक होणार की अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांचा विजय होणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. तरी भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास गगणात मावेनासा झाला आहे. आमदार लक्ष्मण जगताप हॅट्रीक करणार असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले जात आहे.

विधानसभा निवडणुकीचे मतदान काल सोमवारी (दि. 21) उत्साहात पार पडले. चिंचवड विधानसभा गेल्या वर्षीपेक्षा यंदा तीन टक्क्यांनी मतदान कमी झाले. मतदानाचा हा घसरता टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे अद्यापतरी सांगता येणार नाही. परंतु, भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांच्यात घासून मतदान झाले आहे. टक्केवारी घसरल्याने दोन्ही उमेदवारांपैकी त्याचा कोणाला फायदा होणार हे येत्या 24 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघात 53 टक्के मतदान झाले. 2014 च्या निवडणुकीत 56.30 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर, 2009 रोजीचे मतदान 50.53 टक्के झाले होते. यंदा तीन टक्के मतदान कमी झाले आहे. त्याचा अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना फायदा होणार की, आमदार लक्ष्मण जगताप पुन्हा हॅट्रीक करणार हे पाहणे गरजेचे आहे.

भाजप कार्यकर्त्यांना कमालीचा आत्मविश्वास

चिंचवड विधानसभा मतदार संघात घासून मतदान झाले असले तरी भाजप कार्यकर्त्यांना आमदार लक्ष्मण जगताप यांचाच विजय होणार असल्याचा आत्मविश्वास आहे. त्यासाठी भाजपच्या स्वतःला निष्ठावंत मानणा-या चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी जगतापांचे किती प्रमाणिकपणे काम केले आहे, हे सर्वश्रृत आहे. परंतु, त्यांना वाटणारा आत्मविश्वास हा त्यांनी केलेल्या कामाचा आहे की, अन्य कोणत्या करिष्म्याचा हे सांगणे थोडे कठीण आहे. तथापि, विरोधकांच्या मनामध्ये मात्र, ईव्हीएमविषयी अद्यापही अविश्वासाचे वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button