breaking-newsमहाराष्ट्र
चंद्रपुरातील तीन शहरात पाच दिवस लॉकडाउन
चंद्रपूर – राज्यातील सर्वात आधी ग्रीन झोन बनलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा बस्तान ठोकले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. त्यामुळे हॉट स्पॉट बनलेल्या जिल्ह्यातील तीन शहरात आजपासून २१ऑगस्टपर्यंत म्हणजेच पाच दिवस लॉक डाउन घोषित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील गोंडपिंपरी , बल्लारपूर आणि मौजा घुग्घुस या तीन शहरात हा लॉक डाउन जारी राहणार आहे. लॉक डाउन काळात मेडिकल दुकाने, दवाखाने आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ठराविक वेळेत खुली राहतील.जिल्ह्यात सध्या ७७ कंटेन्मेंट झोन आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा १०२७ इतका आहे.