Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
गृहकर्ज ओव्हरड्राफ्ट खाते बँकांसाठी डोकेदुखी
!['पंतप्रधान आवास योजने'तील साडेतीन हजार घरांची होणार सोडत](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/home4.jpg)
मुंबई: उच्च रिटर्न भरण्याच्या पर्यायांमधून बाहेर पडल्यानंतर कर्जदार आपल्या गृहकर्ज ओव्हरड्राफ्ट खात्यात मोठ्या ठेवी ठेवत आहेत. त्यामुळे गृहकर्ज ओव्हरड्राफ्ट खाते बँकांसाठी डोकेदुखी बनले आहेत.
होम लोन ओव्हरड्राफ्ट सुविधेमुळे कर्जदार आगाऊ रक्कम बचत खात्याच्या रूपात वापरू शकतात आणि अधिकाधिक निधी फॉरेनला ट्रान्सफर करू शकतात. यामुळे खात्यात ठेवलेल्या अतिरिक्त पैशाच्या मर्यादेपर्यंत गृहकर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. मात्र बँकांनी आता नवीन ग्राहकांना ही ऑफर देणे थांबवले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले, ओव्हरड्राफ्ट खात्यांमधील निष्क्रिय निधी वाढत आहे. जर ओव्हरड्राफ्ट खात्यात कर्जाची रक्कम असेल, व्याज उत्पन्न नसल्याने बँक सर्व पैसे गमावतात. परंतु याचा फायदा एजंट्सला होतो.