गुलाल तयार ठेवा…संजयमामा लाखांच्या मताने निवडणून येणार : रोहित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Rohit.jpeg)
बारामती : माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार संजयमामा शिंदे यांची २२ एप्रिल रोजी पवारसाहेबांनी बारामतीच्या कार्यक्रमात उमेदवारी जाहीर केली होती, त्याच दिवशी संजयमामांचा विजय झालेला आहे. ते लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार आहेत. २३ मे ला गुलाल तयार ठेवा, मी मामांच्या विजयी सभेला येईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व व पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहितदादा पवार हे कर्जत-जामखेड येथे दुष्काळ दौऱ्यावर जात असताना करमाळा शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचे जामखेड चौक येथे स्वागत करुन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी दादांना अल्पोपहार घेण्याचा आग्रह केला. व दादांनीही होकार दिला. यावेळी दादांनी अल्पोपहार घेत असताना कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
दरम्यान, रोहित पवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनीही विविध विषयावर चर्चा केली. यावेळी बारामती अँग्रोचे व्हा. चेअरमन सुभाष गुळवे, नगरसेवक संजय सावंत, बोरगावचे सरपंच विनय ननवरे, नगरसेवक महादेव फंड, कै. बी. गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गायकवाड, युवक नेते प्रताप जगताप, रा.यु.काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड, गुळसडीचे मा.सरपंच मानसिंग खंडागळे, युवा नेते आशपाक जमादार, मनसे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, फारुक बेग, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळे, राजकुमार गुंड, अमर शिंगाडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.