गुण पडताळणी ‘अशी’ करता येणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/online-boy-img.jpg)
पुणे : राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना तो करता येणार आहे. त्यासाठी अर्जाचा आवश्यक नमुना संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी तो डाऊनलोड करुन स्वयंसाक्षांकित गुणपत्रिकेच्या प्रतिसह विद्यार्थ्यांनी 31 मे ते 9 जून या कालावधीत तो अर्ज व शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे सादर करायचा आहे.
उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी आधी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रतीसाठी 31 मे ते 9 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार करुन घ्यायचे असेल अशा विद्यार्थ्यांना जून ते ऑगस्ट व फेब्रुवारी ते मार्च 2019 अशा दोनच संधी उपलब्ध असतील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित वृत्त-