breaking-newsमहाराष्ट्र

गाव समृध्द करण्यासाठी गट-तट विसरुन प्रयत्न करा – आमदार शिवाजी नाईक

शिराळा (प्रतिनिधी)- करुंगली गावात सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीशी जनतेने आपल्या मतांचा आशीर्वाद दिल्यामुळे अनेक मातबरांना घरी बसावे लागले आहे. ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी राजकीय गट-तट न पाहता जनतेच्या विश्वासाला पात्र राहून आपले गाव समृद्ध बनवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव नाईक यांनी केले.
करुंगली (ता. शिराळा) येथील नूतन उपसरपंच व सदस्य सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी करुंगली गावच्या उपसरपंचपदी सौ.रुक्मिणी नथुराम पाटील यांचे निवड झालेबद्दल व इतर नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आमदार शिवाजीराव नाईक यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सदस्य प्रताप रामचंद्र पाटील, संचालक शिवाजी नायकवडी, आनंदा पाटील, बापू सुतार, माजी सरपंच बाजीराव पाटील, संजय नायकवडी, आनंदा पवार, आनंदा चौगुले, वसंत पवार, हिंदुराव पवार, संगीता पवार, अनुसया नायकवडी, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.
आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, गावातील अनेक मातबरांना धूळ चारत सर्वसामान्य आणि जनतेची कामे करणारे लोक गावच्या सभागृहात गेल्यामुळे समन्वयातून काम होईल. त्यांनी शासनाच्या सर्व योजना गावपातळीवर राबवून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात. गावचा विकास साधण्यासाठी निवडून आलेल्या उमेदवारांनी समन्वयातून काम केले पाहिजे. निवडून आलेल्यांनी आता गट-तट न पाहता गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. गावच्या विकासाचा आलेख चढता ठेवण्याकरीता गावात एकत्र बसून विकासात्मक निर्णय घ्यावेत. विशेषतः महिलांनी व युवकांनी पुढे येवून जेष्ठांच्या मार्गदशानाखाली गावच्या विकासाची दिशा ठरवावी, असेही ते म्हणाले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button