गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपीस अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/arrest-LOCKER.jpg)
- गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपीस अटक
पुणे – वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. सनी उर्फ गिरीष महेंद्र हिवाळे (20, रा. काळेपडवळ, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे
वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी आरोपी भर रस्त्यात गाडीची तोडफोड करून पळून गेले होते. याप्रकरणी तीन व्यक्तींविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, पोलीस हवालदार तुषार खडके व रिजवान जिनेडी यांना आरोपी जूना बाजार येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्याने होंडा सिटीची तोडफोड करून मी व माझे साथीदार दुचाकीवरून पळून गेलो होतो, अशी कबुली दिली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील व हर्षल कदम, पोलीस कर्मचारी रिजवान जिनेडी, तुषार खडके, सचिन जाधव, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, प्रकाश लोखंडे, मेहबूब मोकाशी, गजानन सोनुले, तुषार माळवदकर, प्रशांत गायकवाड, विजेसिंग वसावे, अशोक माने यांच्या पथकाने केली.