गरिबांशी नाळ जोडलेली असल्याने लोककल्याणकारी कामे करता आली – सभापती शिवाजीराव गायकवाड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/new-46.png)
तुळजापूर | महाईन्यूज |
तुळजापूर तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून आपण गोरगरीब जनतेची विक्रमी विकासाची कामे केल्याचे प्रचंड समाधान आहे हे पद लोकांना न्याय देण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे असे उद्गार पत्रकारांशी संवाद साधताना पंचायत समिती सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी काढले.
याप्रसंगी आपण अडीच वर्षाची आपली कारकीर्द पूर्ण करून आगामी काळात कार्यरत राहणार असून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात कार्यक्षम पंचायत समिती बनवण्यामध्ये मला खूप मोठे यश मिळाल्याचे समाधान आहे, राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करून गोरगरीब सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला भरभरून यश मिळाले त्यामुळे आपण समाधानी आहोत.
सभापती होण्यापूर्वी आपण समाजकारणांमध्ये आणि राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केले. काँग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दीर्घकाळ काम केले असल्यामुळे या कामाच्या जोरावर आपण सभापती पदाच्या काळात भरीव कामगिरी करू शकलो असेही सभापती गायकवाड यांनी सांगितले
काँग्रेसचे नेते मधुकरराव चव्हाण माजी आमदार आलुरे गुरुजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. धीरज पाटील, कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन सुनील चव्हाण, माजी सभापती मुकुंद डोंगरे ,शिवाजीराव वडणे, या सर्व नेते मंडळी च्या मार्गदर्शनाखाली आपणास काँग्रेस पक्षाने सभापती होण्याची संधी दिली कोणताही जात-धर्म न पाहता सरसकट गोरगरीब माणसाला सहकार्य करण्याची भूमिका गेल्या अडीच वर्षात आपण ठेवली.
यामध्ये उदयपूर येथील कार्यशाळेमध्ये आपण आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेमध्ये स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महाराष्ट्रातील सभापती म्हणून मांडलेली भूमिका देशाच्या पातळीवर राबवली गेली त्यामुळे वाढीव कुटुंबाच्या याद्या देशभरामध्ये होऊ शकल्या आणि उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय मिळाला ही मोठी उपलब्धी या सभापतीच्या कार्यकाळात मिळालेली आहे
उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्व पंचायत समितीमध्ये तुळजापूर पंचायत समितीने गेल्या वीस वर्षांमध्ये विक्रमी योजना खेचून आणल्या आहेत यासाठी सर्व पंचायत समिती सदस्यांनी केलेले सहकार्य मोलाचे आहे त्याला मधुकरराव चव्हाण यांनी जोरदारपणे शासन दरबारी मांडल्यामुळे तालुक्यातील हजारो लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला आहे
पारधी आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि या सर्व योजनांमध्ये यांचा समावेश नाही अशा लोकांचा प्रधान आवास प्लस या योजनेमध्ये झालेला समावेश खूप महत्वाचा आहे आठ तालुक्यांमध्ये 45 हजार लोकांनी नवीन नोंदणी केली, 25 एवढ्या विक्रमी नोंदणीचा आहे हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.
याशिवाय 2012 मध्ये झालेला शासन निर्णय जिल्ह्यामध्ये कोठेही राबविण्यात आला नव्हता त्याचा पाठपुरावा करून आपण जिल्हास्तरावर आवाज उठवला तेव्हा नव्याने तेराशे 50 प्रस्ताव तयार झाले त्यातील 870 प्रस्ताव केवळ तुळजापूर तालुक्यातील आहेत. मी पद्मा घेतला तेव्हा 2200 शौचालयाचे आर्थिक व्यवहार अपुरे होते ते सलग दीड वर्षे प्रयत्न करून आपण मार्गी लावले, त्याचबरोबर 13 हजार 500 नवीन प्रस्ताव करण्यामध्ये यश मिळाले या कामासाठी पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेले योगदान प्रशंसनीय आहे या काळात ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक स्तरावरून अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत याउलट जिल्हास्तरावर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मात्र खूप मोठे यश मिळालेले आहे.
पंचायत समितीच्या कारभारामध्ये झिरो पेंडन्सी हे माझ्या कारकिर्दीचे खास वैशिष्ट्य आहे यापूर्वी पंचायत समितीला कुलूप लावण्याचे आंदोलन अनेक वेळा झाले मात्र आपल्या कार्यकाळात एकही आंदोलन झालेले नाही यावरून पंचायत समितीने सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन समाधान कारक कारभार केल्याचे दिसून येते असेही आणि निमिताने सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी आपल्या कारकीर्दीची माहिती देताना सांगितले.