breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी १६६ विशेष गाडय़ा ; २५ मेपासून आरक्षण

मुंबई : गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी यंदा १६६ विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे येथून या गाडय़ा करमाळी, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, पेरनेम, थिविम, झारापसाठी सोडण्यात येतील. त्यांचे आरक्षण २५ मेपासून सुरू होणार आहे.

* सीएसएमटी ते सावंतवाडी रोड (२६ विशेष गाडय़ा- गुरुवार व शनिवार सोडून)

२८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबपर्यंत ही गाडी सीएसएमटीतून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल, तर सावंतवाडी येथून दुपारी ३ वाजता सुटणार आहे.

* सीएसएमटी ते सावंतवाडी रोड (१२ विशेष गाडय़ा- प्रत्येक गुरुवारी व शनिवारी सुटेल)

२९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबपर्यंत सीएसएमटीतून ही गाडी दर गुरुवारी व शनिवारी मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडीतून दुपारी ३ वाजता सुटणार आहे.

* सीएसएमटी ते रत्नागिरी ते पनवेल (४० विशेष गाडय़ा- दररोज धावणार)

२८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबपर्यंत ही गाडी सीएसएमटी स्थानकातून रत्नागिरीसाठी सकाळी ११.३० वाजता सुटेल, तर रत्नागिरीतून ही गाडी रात्री १०.५० वाजता पनवेलसाठी सुटणार आहे.

* पनवेल ते सावंतवाडी रोड ते सीएसएमटी (४० विशेष गाडय़ा- दररोज धावणार)

२९ ऑगस्ट ते १७ सप्टेंबपर्यंत ही गाडी पनवेल येथून सावंतवाडीसाठी दररोज रात्री १० वाजता सुटेल, तर सावंतवाडी येथून सीएसएमटीसाठी ही गाडी दुपारी १२.२५ वाजता सुटणार आहे.

* एलटीटी ते पेरनाम (सहा विशेष गाडय़ा- फक्त शुक्रवारी)

३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबपर्यंत ही गाडी दर शुक्रवारी एलटीटीतून मध्यरात्री १.१० वाजता सुटेल आणि पेरनेम येथून दुपारी ३.१० वाजता सुटणार आहे.

* एलटीटी ते झाराप (सहा विशेष गाडय़ा- प्रत्येक सोमवारी)

२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबपर्यंत ही गाडी प्रत्येक सोमवारी एलटीटीतून मध्यरात्री १.१० वाजता सुटेल आणि झाराप येथून दुपारी ३.३० वाजता सुटणार आहे.

* एलटीटी ते झाराप ते पनवेल (आठ विशेष गाडय़ा- प्रत्येक गुरुवार व शुक्रवार)

२२ ऑगस्ट ते १२ सप्टेंबपर्यंत एलटीटीतून प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ४.५५ वाजता सुटेल आणि २३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबपर्यंत झाराप येथून प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११.१० वाजता सुटेल.

* पनवेल ते सावंतवाडी रोड (आठ विशेष गाडय़ा- प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी)

२३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबपर्यंत ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पनवेल येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि प्रत्येक शनिवारी सावंतवाडीतून सकाळी १० वाजता सुटणार आहे.

* पनवेल ते थिविम ते एलटीटी (आठ विशेष गाडय़ा- प्रत्येक शनिवार व रविवार)

२४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबपर्यंत ही गाडी शनिवारी पनवेलमधून थिविमसाठी रात्री ९ वाजता सुटेल आणि प्रत्येक रविवारी सकाळी ११.३० वाजता थिविममधून एलटीटीसाठी सुटणार आहे.

* पुणे ते रत्नागिरी (व्हाया कर्जत, पनवेल- सहा विशेष गाडय़ा- प्रत्येक गुरुवार व शुक्रवार)

२९ ऑगस्ट ते १३ सप्टेंबपर्यंत ही गाडी प्रत्येक गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजता पुणे येथून सुटेल, तर ३० आगॅस्टपासून रत्नागिरीतून प्रत्येक शुक्रवारी सकाळी ८ वाजता गाडी सुटणार आहे.

* पुणे ते करमाळी ते पनवेल (दोन विशेष गाडय़ा)

३० ऑगस्ट रोजी पुणे येथून दुपारी १२.१० वाजता करमाळीसाठी सुटेल. ३१ ऑगस्ट रोजी करमाळीतून पहाटे पावणेसहा वाजता पनवेलसाठी गाडी सुटणार आहे.

* पनवेल ते सावंतवाडी रोड (दोन विशेष गाडय़ा)

३१ ऑगस्ट रोजी पनवेलमधून रात्री ७.४० वाजता गाडी सुटेल, तर सावंतवाडीतून १ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता गाडी सुटेल.

* पनवेल ते सावंतवाडी रोड ते एलटीटी (दोन विशेष गाडय़ा)

१ सप्टेंबर रोजी पनवेल येथून रात्री ८ वाजता गाडी सुटेल, तर सावंतवाडीतून २ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता गाडी सुटणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button