breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

गंभीर गुन्हे दाखल झालेल्यांना नोकऱ्या कोण देणार? राज ठाकरे

नवी मुंबई: मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी तरुणांवर 307 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले. आता आरक्षण मिळाले तरी त्यांना नोकरीची संधी मिळणार नाही, असें म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच मराठा आंदोलनात परप्रांतियांच्या सहभागावरुनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. सरकार जनतेला कोट्यवधींच्या योजनांचे आमिष दाखवून फसवणूक करत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत, मात्र त्या भरण्यासाठी सरकारकडे पैसा नाही का? असा सवालही त्यांनी विचारला.
मराठा समाज शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागतोय. मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. फक्त कोट्यवधींच्या घोषणा करत आहे. जनतेला त्यांच्या या घोषणांमधून आशा वाटते, ते टाळ्या वाजवतात. मात्र सरकार जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवी मुंबईतील कळंबोलीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले. मात्र या आंदोलनात परप्रांतिय चेहऱ्यांचा सहभाग होता. परप्रांतिय चेहऱ्यांमुळे आंदोलन बदनाम होऊ देऊ नका, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.
नोटाबंदीचा नोकरदारांना फटका 
मोदी सरकारने सत्तेत आल्यावर जी नोटाबंदी केली. त्यामुळे 3 कोटी नोकरदारांना आपली नोकरी गमावावी लागली. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मात्र योगा करण्यात व्यस्त असल्याचा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button