Breaking-newsमहाराष्ट्र
खाजगी लक्झरी बस उलटून 16 जण जखमी
![Shocking! Horrific accident in Gujarat; Ten members of the same family were killed when a truck hit a car](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/accident-1-2.jpg)
कोल्हापूर – कोल्हापूर जवळ खाजगी लक्झरी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 16 जण जखमी झाले आहेत. हि घटना मलकापूर जवळील आंबवडे गावा जवळ चालकाचा बस वरील ताबा सुटून सायंकाळी घडली आहे.
न्यू इंग्लिश स्कूल सातारा इथल्या सन 1977 च्या बॅचच्या गेट टुगेदर पन्हाळा येथे होता. तो कार्यक्रम आटोपून परतातना हा अपघात झाला आहे.
सर्व जखमी बेंगलोर, मुंबई, पुणे , नासिक, सातारा चे रहिवाशी असून त्यांच्यावर प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.