breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

खड्ड्यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं टायर फुटलं

परभणी – खराब रस्त्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना दररोज बसतो. पण ते काहीच करु शकत नाही. खराब रस्त्यावरील  खड्ड्यांचा फटका मुख्यमंत्र्यांनाही बसलाय. परळीहून सर्वधर्मिय विवाह सोहळा आटोपून मुख्यमंत्री परत जात होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं टायर फुटलं. त्यामुळे त्यांना दुसरी गाडी येईपर्यंत वाट पाहावी लागली,  कोणतीही सुरक्षा नसलेल्या गाडीने ते रवाना झाले.

परळी येथून लग्नसोहळा आटोपून परभणीमार्गे नांदेडकडे निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे टायर खड्ड्यात फुटल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा, या मागणीसाठी सोनपेठच्या पत्रकारांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलं. मुख्यमंत्री 22 फेब्रुवारी रोजी परळीहून नांदेडकडे निघाले असता, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे खराब रस्त्यावर असलेल्या खड्यात गाडी गेली आणि टायर फुटलं. घटना परळी ते गंगाखेड येथील निळा पाटीजवड घडली.

ही घटना समजताच गाडी थांबवून मुख्यमंत्रांना काहीकाळ रस्त्यावर उभं राहावं लागलं. कुठलीही सुरक्षा नसणाऱ्या एका खासगी गाडीत बसून नांदेडकडे जावं लागलं. त्यामुळे सोनपेठ येथील पत्रकारांनी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीसाठी खड्ड्यात आंदोलन केलंय.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button