breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खडसे म्हणाले, नाव फायनल झाल्याचं सांगून आम्हाला मूर्ख बनवण्यात आलं

जळगाव | संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या तिघांचीही नावे फायनल झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात इतरांचीच नावं जाहीर करण्यात आली. ज्यांची नावं जाहीर केली, ते मुंबईत फॉर्म भरण्यासाठी आले कसे? अर्जासोबत लागणारी कागदपत्रे लॉकडाऊनच्या काळात त्यांनी तयार केली कशी? याचा अर्थ त्यांची नावं आधीच ठरलेली होती. हे सर्व पूर्वनियोजित होतं. आम्हाला केवळ मूर्ख बनवण्यात आलं, असा संताप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस मीच केली होती. त्याचीच आज शिक्षा भोगतोय, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ज्यांच्या नावाची साधी चर्चाही झाली नाही, अशा लोकांना तिकीटं देण्यात आली. आमची नावं फायनल होऊनही आमचा पत्ता कापण्यात आला. ज्यांना तिकीट देण्यात आले त्यांनी रात्रभरात उमेदवारी अर्जासोबत लागणारी कागदपत्रं आली कशी? त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर मार्च महिन्याच्या तारखा आल्या कशा? याचा अर्थ त्यांना उमेदवारी मिळणार हे मार्चमध्येच निश्चित झालं होतं. आम्हाला मात्र मूर्ख बनवून आमची फसवणूक करण्यात आली, असं ते म्हणाले. आम्हाला डावलून इतर निष्ठावंतांना तिकीट दिलं असतं तर समजू शकलो असतो, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांसाठी ज्या मेघा कुलकर्णींनी आमदारकीची सीट सोडली. त्यांना तरी विधानपरिषदेचं तिकीट द्यायला हवं होतं ना? असा सवालही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button