breaking-newsपुणेमहाराष्ट्र

खंडाळ्याजवळ मदुराई एक्‍स्प्रेस घसरली, काही रेल्वे रद्द

पुणेः मुंबई-पुणे मार्गावर मदुराई एक्‍स्प्रेसचा एक डबा खंडाळ्याजवळ रुळावरून घसरल्याची घटना आज पहाटे घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र मुंबई-पुणे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या अपघातामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई-पुणे सिंहगड, प्रगती आणि इंटरसिटी एक्‍स्प्रेस, कर्जत-पुणे पॅसेंजर या गाड्यांच्या दोन्ही बाजुंच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे वळवण्यात आली आहे. अपघातग्रस्त एक्‍स्प्रेसची बोगी बाजुला काढण्यात आली असून गाडी पुढे रवाना करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button