Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोयना परिसर भूकंपाने हादरले, सातारा जिल्ह्यात भीतीचे वातावरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/A-Gallery_19.jpg)
सातारा, महाईन्यूज
साताऱ्यातील कोयना परिसर भूकंपाच्या धक्याने हादरला आहे. या भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल इतकी होती. रात्री दीड वाजेच्या सुमारास कोयना परिसरातील पाटण, कोकण किनारपट्टीचा परिसरात भुकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपाचा केंद्र बिंदू वारना खोऱ्यातील चांदोली गावच्या पश्चिमेला 6 किमी अंतरावर असल्याचं सांगितलं जात आहे. या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोयना धरणाच्या परिसरात नेहमी भूकंपाचे धक्के जाणवत असता. मागील महिन्यात 24 जून रोजी वारणा खोऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. भूकंपाचे 2.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची नोंद झाली.
दरम्यान, वारणा खोऱ्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोयना धरणाला यापासून कोणताही धक्का नसल्याचंही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.