Breaking-newsपुणेमहाराष्ट्र
कोपरगावात मारहाणीत एक गंभीर जखमी
कोपरगाव – मागील किरकोळ भांडणात शिव्या दिल्याच्या कारणावरुन सुभाषनगर येथील दोघांनी तीक्ष्ण हत्याराने केलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला.
या दोन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे उभे केले असता त्यांना 22 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. यासंदर्भात रेखा गणेश विसपुते रा. नगरपालिका शाळेच्या मागे सुभाषनगर यांनी शोएब हारुण तांबोळी (वय 27) व तौफिक हारुण तांबोळी वय 29 यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यात म्हटले की, सागर तान्हाजी विसपुते हा कॅरम बोर्डचे दुकानासमोर उभा होता, तेव्हा आरोपी शोएब व त्याचा भाऊ तौफिक यांनी किरकोळ भांडणात शिव्या दिल्याच्या कारणावरुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात तो जबर जखमी झाला.