केंद्र आणि राज्यातील दुवा “आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत” : देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Devendra-Fadnavis-new-book-aatmnirbhar-maharashtra-aatmnirbhar-bharat.jpeg)
पुस्तकात केंद्राकडून राज्याला मिळालेल्या निधीचा मांडला लेखाजोखा
मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा आणखी एक पुस्तक महाराष्ट्राच्या जनतेच्या भेटीला आणला आहे. “आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत” असे या पुस्तकाचे नाव असुन यामध्ये केंद्राकडून राज्याला मिळालेल्या निधीचा लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे.
पुस्तक प्रदर्शित करण्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा ट्विटर खात्यावरून दिली आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी तसेच इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. पुस्तक वाचकापुढे सादर करतांना मला अतिशय आनंद होत आहे असे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ हे अभियान सुरू केले आहे. याचा महाराष्ट्राला कसा फायदा होईल अशा सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्याची माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटरवर म्हटले आहे की, “‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ हे नवीन पुस्तक वाचकांपुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मराठी/हिंदी/इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोरोना काळात आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी समाजातील सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान जाहीर केले. त्याचा महाराष्ट्राला कसा लाभ होणार याचे सोप्या शब्दात यात विश्लेषण आहे.”
या ३६ पानी पुस्तकाला भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ‘संदेश’ही दिला आहे. शिवाय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पुस्तकाला शब्दरुपी शुभेच्छाही दिल्या. या छोटेखानी कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडेजी, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.