Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयांचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले उद्या सोमवारी (दि.7) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोरोना काळात आंबेडकरी चळवळीतील ज्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे निधन झाले त्यांच्या कुटंबियांची ते भेट घेणार आहेत.
आठवले यांचे सोमवारी सकाळी सात वाजता विश्रामगृह येथे आगमण होईल. त्यानंतर सकाळी 9 वाजता रिपब्लिकन नेते ऍड. पंडीतराव सडोलीकर व शा. शि. कवाळे यांच्या निवासस्थानी ते भेट देतील. त्यानंतर दसरा चौकातील मुस्लिम बोर्डींग येथे सकाळी दहा वाजता शोकसभा होईल येथे ही आठवले प्रमुख उपस्थित असतील.