केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले हे ‘अजब’ वक्तव्य
शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य
जालना | प्रतिनधी
शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे अजब वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. सुटा बुटातल्या लोकांनी शेतकऱ्यांचे आंदोलन घेतले असून केंद्र सरकार हेच शेतकऱ्यांच्या बाजूचे असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील दानवे यांनी केले. शेतकरी आंदोलनाबाबत त्यांनी केलेल्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरु आहे.
जालना जिल्ह्यातील कोलते टाकली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान दिल्लीतील शेतकरी आंदोलनानंतर केंद्र सरकारने काही प्रमाणात माघार घेण्याचे संकेत दिले होते. परंतु शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी हे स्पष्ट केले की कोणत्याही परिस्थितीत नवीन कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत. मात्र केंद्र सरकारने बुधवारी दिलेल्या नव्या प्रस्तावात एमएसपीसह, एपीएमसी कायद्यात बदल आणि खासगी प्लेअर टॅक्सची चर्चा आहे. त्यामुळे आंदोलक शेतकर्यांनी आपली भूमिका कडक केली आहे. ते म्हणाले की, सरकार कायदा मागे न घेण्याच्या आग्रहावर ठाम असेल तर शेतकरीदेखील निदर्शने करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.