“काळजी नको मी सर्व पाहतो ” शरद पवारांचं माणगावकरानां आश्वासन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Capture-11.png)
माणगांव तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे माणगांव येथे मंगळवारी म्हणजे ९ जूला महाड अर्बन बँके समोर हजर झाले. त्यावेळी आपत्तीग्रस्त नागरिकांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी माणगांवकरांच्या व्यथा मांडल्या. यावेळी खा. सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
माणगांव शहरात गेले ८ दिवस वीज व पाणी नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेचे खांब तुटल्याने वीज पुरवठा गेले ८ दिवस बंद आहे. त्यामुळे पाणी पुरवठाही बंद होता. मात्र जनरेटर लावून तो तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेला आहे.
अनेकांच्या घराचे पत्रे, कौले उडून अतोनात नुकसान झाले आहे. या वादळात छपर उडाल्याने लोकांच्या घरातील अन्नधान्याची नासाडी झाली आहे. या वादळातील आपतग्रस्तना तातडीने मदत मिळावी व माणगाव तालुक्यातील वीज पुरवठा त्वरित सुरू करावा अशा प्रकारच्या अनेक समस्या व मागण्या माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी मांडल्या. यानंतर शरद पवार यांनी गाडी जवळच उभे राहूनच या सर्व समस्या व मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण होतील. “काळजी नको मी सर्व पाहतो ” असे माणगावकरानां आश्वासन दिले आहे.शरद पवार यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे माणगावकरांना ऩक्कीच थोडासा तरी दिलासा मिळाला असेनं