breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कालीदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी विधानसभा अध्यक्ष

मुंबई : विधानसभेचे सदस्य आणि वडाळ्याचे आमदार कालीदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कोळंबकर थोड्याच वेळात राजभवनात शपथ घेणार आहेत. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी कोळंबकर यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते, दिलीप वळसे पाटील यांची नावं देखील चर्चेत होती.  निवडीनंतर उद्या कोळंबकर हे सर्व आमदारांना शपथ देणार आहेत.

विधानसभा सचिवांकडे विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, के. सी. पाडवी आणि भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर या विधानसभेच्या तीन ज्येष्ठ सदस्यांची नावं आली होती. त्यापैकी ज्येष्ठ सदस्य म्हणून कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेण्यासाठी राजभवनात आल्याचं कोळंबकर यांनी सांगितलं. उद्या विधानसभा सत्र सुरू झाल्यावर सर्व पक्षीय नवनिर्वाचित आमदारांना गोपनीयतेची शपथ देण्यात येणार असल्याचं कोळंबकर यांनी सांगितलं आहे.

कोण आहेत कोळंबकर
कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये कालिदास कोळंबकर होते. कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसआधी ते शिवसेनेत होते. मात्र, राणेंसोबत ते काँग्रेसमध्ये आले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button