breaking-newsपुणेमहाराष्ट्र
कार-ट्रकचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात आज(दि.7)पहाटे भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर देहुरोडजवळ हा अपघात झाल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. या वृत्तानुसार अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हा अपघात इतका भीषण होता की ट्रकसोबत झालेल्या टक्कर नंतर अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पावसामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने स्विफ्ट कार आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. यात स्विफ्ट कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पराग हरेगावकर, राजेंद्र मांजरे आणि अभिषेक शर्मा अशी मृतांची नावं आहेत.