breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण विजयी

मुंबई – राज्यातील विधानपरिषदेच्या औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि पुणे शिक्षक मतदारसंघ या पाचही जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून ३ डिसेंबरपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यापैकी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. सतीश चव्हाण यांना तब्बल 116638 मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या शिरीष बोराळकर यांना 58743 मतांवर समाधान मानावे लागले आहे.

सतीश चव्हाण हे सलग दोन वेळा औरंगाबाद पदवीधरच्या जागेवर निवडून आले होते. आता सलग तिसऱ्यांदा त्यांनी विजय मिळवला आहे. गेल्यावेळी चव्हाण यांच्याविरोधात भाजपाचे शिरीष बोराळकरच उभे होते. मात्र तेव्हासुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून यंदा सतीश चव्हाण हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलात ते 34 हजार मतांनी आघाडीवर होते, त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष सुरू केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button