breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

ओएनजीसीच्या प्रकल्पातून रसायन गळती; अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी

नवी मुंबईच्या उरण येथील ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ओएनजीसी) प्रकल्पात रसायन गळती झाल्याचे वृत्त आहे. काही अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दुर्घटनेत कोणतीही हानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीला ओएनजीसीच्या याच प्रकल्पामध्ये भीषण लागली होती, ही आग इतकी मोठी होती की आगीचे लोळ उठत होते. अग्निशमन दलाला तीन तासानंतर ही आग विझवण्यात यश आले होते. या अग्नितांडवात चार जणांचा मृत्यू झाला होता, यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तीन जवानांचा समावेश होता. गॅस प्रकल्पामध्ये सकाळी सात वाजता ही आग लागली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button