breaking-newsपुणेमहाराष्ट्र
एल्गार परिषदेच्या खटल्यात पुरवणी आरोपपत्र सादर
एल्गार परिषदेच्या खटल्यामध्ये पुणे पोलिसांनी गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) माजी सरचिटणीस गणपती आणि वरवरा राव यांच्यासह पाच जणांवर पुरवणी आरोपपत्र सादर केले. शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत हे आरोपपत्र बजावण्यात येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमिगत चळवळीसाठी पैसे जमा करणे, शस्त्रांच्या तस्करीचा कट रचल्याने पोलीस तपासात पुढे आल्याने संबंधित आरोपींवर दोन समाजात तेढ आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वरवरा राव, अनिल सुरेंद्र गडिलग यांनी माओवाद्यांना भारतीय सुरक्षा दलांसंदर्भात महत्त्वाची गोपनीय माहिती पुरवली. या माहितीच्या आधारे माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर हिंसक हल्ले केले. त्यात मोठय़ा प्रमाणावर जीवित हानी झाल्याचा दावाही आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे.