‘एमपीएससी’ अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे | महाईन्यूज | प्रतीनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा (विद्युत अभियांत्रिकी) निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतून एकूण १६ हजार ७३८ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबरला होणार आहे.
आयोगाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकाची यादी आणि कटऑफ गुण आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. आयोगाने निश्चित केलेल्या वेळेत अर्ज करून परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्यांपैकी जवळपास निम्मे उमेदवार हे पुणे येथून परीक्षा दिलेले असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.