उमेदवारीसाठी केजरीवालांनी घेतले ६ कोटी रूपये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/download-5.jpg)
दिल्ली – लोकसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी पश्चिम दिल्लीतून आम आदमी पक्ष (AAP) चे उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखडनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. माझ्या वडिलांनी उमेदवाराचे तिकीट मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी ६ कोटी रूपये दिल्याचा आरोप उदय जाखड यांनी केला आहे.
उदय यांनी म्हटलं की, ही गोष्ट स्वतः माझ्या वडिलांनी मला सांगितली. यासाठी त्यांना नकार देखील दिला होता. एक नागरिक होण्याच्या नात्यानं हे माझं कर्तव्य आहे की ही सत्यता जगासमोर आणावी. माझ्या वडिलांनी तीन महिन्यापूर्वीच राजकारणात प्रवेश केला. माझे वडील आम आदमी पक्षाचे कधीही सदस्य नव्हते आणि कधीही त्यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनात भाग घेतला नव्हता. ते कधीही आपमध्ये नव्हते. जानेवारी महिन्यात त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
उदयनं पुढे सांगितलं की, वडिलांनी मला सांगितलं की मला आप पक्षाचं तिकीट मिळत आहे. त्यासाठी त्यांनी ६ कोटी रूपये थेट अरविंद केजरीवाल आणि गोपाल राय यांना दिले आहेत. कोणत्याही गैर राजकारणी व्यक्तीला तिकीट देणं ही आश्चर्यकारक बाब आहे. मी माझ्या वडिलांकडे शिक्षणासाठी पैसे मागितले होते त्यासाठी त्यांनी नकार दिला होता. माझ्या वडिलांनी माजी काँग्रेस नेते आणि १९८४ च्या शीख दंगलीतला आरोपी सज्जन कुमारला जामिन मिळण्यासाठी देखील प्रयत्न केले होते. त्यासाठी ते मोठी रक्कम देण्यासाठीही तयार होते.