breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गावक-यांनी अडवला गाड्यांचा ताफा

बारामती – मालेगाव साखर कारखान्यांच्या संचाल मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीत आज (रविवारी) मतदान होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव येथील मतदान केंद्रावर येताना सत्ताधारी गटाच्या कार्येकर्त्यांनी पवारांचा ताफा अडविला. तुम्हाला १०० मीटरच्या आत आपला ताफा घेऊन जाता येणार नाही, असं माळेगावचे सरपंच जयदीप विलास तावरे व त्यांच्या कार्येकर्त्यांनी सुनावले. दरम्यान, माझ्याकडून कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

‘माळेगाव’चे अध्यक्ष रंजन तावरे यांनी अजित पवार हे सत्तेचा गैरवापर करून सभासदांवर दबाव टाकत असल्याचा आरोप केला. दरम्यान, राज्याचे लक्ष लागलेल्या  माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निलकंठेश्वर पॅनल व सहकार बचाव शेतकरी पॅनल मध्ये अटीतटीची लढत होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button