breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळे भाजपची सत्ता गेली- प्रविण दरेकर

मुंबई: तत्कालीन मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे पहाटे उरखलेला शपथविधी भाजप नेत्यांच्या अद्यापही स्मरणात आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावत पुन्हा एकदा या आठवणींवा उजाळा दिलेला आहे.

अजित पवार यांचा पायगुण अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या पायगुणामुळेच आमची (भाजप) सत्ता गेली अशी हळहळ प्रविण दरेकर यांन व्यक्त केलेली आहे. विधानपरिषद सदस्या, शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची विधानपरिषद उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. या वेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात बोलताना म्हटले की, ‘डॉ. निलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून निवड झाली आणि आमचं सरकार आलं आहे. आता त्याच पदावर डॉ. गोऱ्हे यांना पुन्हा नियुक्त करण्यात आलेले आहे.’ अजित पवार यांच्या विधानावर प्रविण दरेकर बोलत होते.

या वेळी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, अजित पवार यांचा पायगुण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या पायगुणामुळे आमची राज्यातील सत्ता गेली आहे. प्रविण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पहाटेचा शपथविधी करुन राज्यात सत्तेवर आणलेले सरकार टीकले नाही. सत्ता गेली. सत्ता गेल्याची भावना भाजपच्या जिव्हारी लागल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. दरम्यान, प्रविण दरेकर यांनी या वेळी डॉ. निलम गोऱ्हे यांच्या विधानपरिषद उपसभापती पदावर झालेल्ये निवडीवर आमचा आक्षेप आहे. सरकार बहुमताच्या जोरावर हट्टपणा करत आहे. येत्या गुरुवारी या मुद्द्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोपर्यंतच सरकारने निवडणूक घेतली, असेही प्रविण दरेकर यांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button