breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
इस्लामपूरात एटीएम अज्ञातांनी फोडले
इस्लामपूर – इस्लामपूर येथील कोल्हापूर रोडवरील बँक ऑफ इंडीयाचे एटीएम अज्ञातांनी शनिवारी पहाटे फोडले. गँस कटरने मशीन तोडून एटीममधील ११ लाख ४५ हजार ६००रुपयांची रोकड लंपास केली आहे. तर घटनास्थळावर ८० हजारांच्या नोटा पडल्या होत्या. स्कार्पिओ गाडीतून आलेल्या तिघा जणांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही कँमेर्यात दिसत आहे.
चोरीचा हा प्रकार पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडला. एटीममध्ये एकून १२ लाख २५ हजार ६०० रु. ची रोकड होती. त्यामध्ये ५०० च्या २१८४, २०००च्या ६६ व १०० च्या १६ नोटा होत्या. चार वर्षापुर्विही हेच मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला होता. घटनास्थळावर श्वान पथकाला पाचारण केले होते. मात्र ते परिसरातच घुटमळले. एटीममधील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून ही चोरी करण्यात आली. पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.