breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा – शरद पवार

मुंबई – माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा, असा सवाल करत शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

एक व्यक्ती अमूकच जागेसाठी अडून राहतो. तो हट्ट पुरविण्याची जबाबदारी इतरांची नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरविला. त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा दिली. सुजय विखे पाटील हे राज्यातील प्रॉमिसिंग लिडर होते का? असा सवालही शरद पवार यांनी केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे आहे. या जागेवर लढण्यासाठी सुजय विखे इच्छुक होते. पण राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला. अर्थात विखे आणि पवार यांच्यातला संघर्ष जुना आहे. ही जागा न सोडण्यामागेही त्याच संघर्षाची किनार आहे. पवारांनी जागा न सोडण्याची घोषणा करतानाच जुन्या वादाचीही आठवण करुन दिली होती.

दरम्यान, शरद पवारांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. पराभवाच्या भीतीने त्यांनी माघार घेतल्याचा आरोप भाजपकडून होतोय. यालाही पवारांनी उत्तर दिलं. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनाही कधी ना कधी पराभव पाहावा लागलाय. पण मी आतापर्यंत कधीही पराभूत झालो नाही. त्यामुळे भाजपचं वक्तव्य बालिशपणाचं आहे. गोंदियात पोटनिवडणूक झाली, तिथे राष्ट्रवादीचा विजय झाला. भाजपने अगोदर स्वतःकडे पाहावं, असं शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button