breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत, हा घ्या पुरावा’; राष्ट्रवादी काँग्रेसचे ट्विट

मुंबई | महाईन्यूज

राज्यामध्ये सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेले नाही. त्यातच आता एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकींचे सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे भाजपाचे नेते या युतीवर टीका करताना दिसत आहे. मात्र या टीकेला शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे नेते उत्तर देताना दिसत आहेत. अशीच टीका काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे नेते अशिष शेलार यांच्यावर केली होती. ‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत,’ असं यावेळी आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक फोटो ट्विट करत यासंदर्भातील पुरावा देत असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाड यांनी आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शेलार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी, “आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत. त्यांनी काहीतरी तंत्रमंत्र केलं असेल. अमूक एक अदृष्य शक्ती आहे वगैरे सांगितलं असेल. पण असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. आमच्या शक्ती आमच्या जवळ आहेत. आमच्या अंतर्मनातून आलेल्या शक्ती या प्रचंड एकनिष्ठ, बलवान आणि स्वत:च्या विचारबरोबर घेऊन जाणाऱ्या आहेत,” असं मत व्यक्त केलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस ठाणेच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेलार यांचा मांत्रिकाच्या वेशातील एका व्यक्तीबरोबरचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. शेलार यांच्याबरोबर उभ्या असणारी व्यक्तीने काळे कपडे परिधान केेलेले आहेत. या व्यक्तीच्या गळ्यामध्ये अनेक माळा असून हातात मोठ्या अंगठ्या असल्याचे दिसत आहे. हा फोटो म्हणजे आव्हाडांनी केलेल्या दाव्याचा पुरावा आहे असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

https://twitter.com/ThaneNCP/status/1196323550249934848
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button