आवक वाढल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरणं, जाणून घ्या आजचा दर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/onion-frame-copy.jpg)
महाईन्यूज | मुंबई
महागाईनं कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्यांचे कांद्यानं गेल्या काही दिवसांपासून चांगलेच वादे केले होते. मात्र वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे त्रासलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. सरकारने कांदा आयात करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे कांद्याचे दर घसले आहेत. बुधवारी 120 रुपयांवरून कांदा 65 रुपये किलोवर आला होता मात्र अजून कांद्याचे दर घसण्याची चिन्हं आहेत. 15 डिसेंबरनंतर अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून आयात करण्यात आलेला कांदा बाजारात आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. कांद्याच्या सुरू असलेल्या दरवाढीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला होता. अवकाळी पावसामुळे कांद्याचं झालेलं मोठं नुकसान लक्षात घेता बाजारात कांद्याचा पुरवठा कमी झालेला होता. कांद्याला मागणी जास्त मात्र पुरवठा कमी असल्यानं त्याचे दर वाढले गेले होते. मागच्या आठवड्यात कांदा 150 रुपये किलो वर होता.
कांदा आयात करण्याचा केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा लासलगाव आणि मनमाडमधील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. कांदा आयात करण्यात येऊ नये या मुख्य मागणी सह कांद्या बाबत केंद्र शासनाच्या धोरणा विरुद्ध शेतकरी उतरले रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीच्या गेट समोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे.अफगाणिस्तानमधून येणारा कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे दर थेट 65 रुपयांवरून 45 पर्यंत गडगडण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गामध्ये या निर्णयाचा मोठा विरोध होताना पाहयला मिळत असला तरीही सर्व सामान्यांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात जवळपास सर्वात जास्त स्वयंपाक घरात वापरला जाणारा कांदा असल्यामुळे हॉटेल्स, ठेल्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांनाच दिलासा मिळणार आहे.